नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना उद्या २० मार्चला होणाऱ्या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पतियाळा होऊस कोर्टाने चारही दोषींची फाशीची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या दोषींच्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.
दरम्यान, पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असताना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कोर्टरूममध्ये दोषी अक्षय कुमार याती पत्नी न्यायाधीशांसमोर रडू लागली. अक्षयकुमारच्या पत्नीने निर्भयाची आई आशादेवी यांचे पाय पकडून आपल्या नवऱ्याची फाशी रोखा अशी विनंती केली.